Thursday, September 04, 2025 06:55:31 AM

भारतीय वंशाच्या रुबी ढल्ला कॅनडाच्या PM पदाच्या शर्यतीतून बाहेर

कॅनडा पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतून बाहेर; रुबी ढल्ला यांचा पक्षावर गंभीर आरोप

भारतीय वंशाच्या रुबी ढल्ला कॅनडाच्या pm पदाच्या शर्यतीतून बाहेर


निवडणूक खर्चात अनियमितता; रुबी ढल्ला यांची PM पदाची संधी संपुष्टात

कॅनडातील पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून भारतीय वंशाच्या रुबी ढल्ला यांना बाहेर काढण्यात आले आहे. शुक्रवारी लिबरल पक्षाने त्यांना अपात्र ठरवले, त्यामुळे त्यांची पंतप्रधान होण्याची शक्यता आता संपुष्टात आली आहे.

लिबरल पक्षाचे राष्ट्रीय संचालक आझम इस्माईल यांनी सांगितले की, पक्षाच्या मतदान समितीने त्यांच्या चौकशीत ढल्ला यांनी निवडणूक खर्चासह एकूण 10 नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले आहे. त्यांच्यावर निवडणूक खर्चाची माहिती उघड न करण्यासोबतच चुकीच्या आर्थिक अहवालांचा आरोप आहे.

रुबी ढल्लांची प्रतिक्रिया
माजी खासदार असलेल्या रुबी ढल्ला यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत लिहिले –

"मला नुकतेच लिबरल पक्षाकडून कळवले गेले आहे की, मला नेतृत्वाच्या शर्यतीतून अपात्र ठरवण्यात आले आहे. हा निर्णय अत्यंत निराशाजनक आहे, विशेषतः माध्यमांमध्ये ही बातमी आधीच लीक झाल्यानंतर."

त्यांनी आरोप फेटाळून लावत हे सर्व खोटे असल्याचा दावा केला. त्यांच्यावर होत असलेला वाढता लोकसमर्थन पक्षाला नकोसा वाटू लागला असल्याने त्यांना शर्यतीतून बाहेर काढल्याचा आरोप त्यांनी केला.

👉👉 हे देखील वाचा : ‘छावा’ चित्रपट वादात, शिर्के वंशजांचा आक्षेप – दिग्दर्शकाने मागितली माफी
 

तीन वेळा खासदार राहिलेल्या रुबी ढल्ला
रुबी ढल्ला यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत तीन वेळा खासदार म्हणून काम पाहिले आहे. त्या एक व्यावसायिक महिला आणि प्रेरक वक्त्या देखील आहेत. त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात मॉडेलिंगही केले होते. वयाच्या 14व्या वर्षापासून त्या लिबरल पक्षाच्या कार्यात सहभागी आहेत.

नेतृत्वाखाली कॅनडाच्या समस्या सोडवण्याचा दावा
रुबी ढल्ला यांचा विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली कॅनडा वेगवेगळ्या समस्यांना चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो. अमेरिकेकडून सतत वाढणारे घरांचे दर, गुन्हेगारीचे प्रमाण, अन्नधान्याच्या किमती आणि टॅरिफच्या धोका यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले होते.

बॉलिवूड कारकीर्द आणि आंतरराष्ट्रीय ओळख
रुबी ढल्ला यांचा जन्म मॅनिटोबाच्या विनिपेग येथे, चंदीगडजवळील मुल्लानपूर या गावातील पंजाबी स्थलांतरित कुटुंबात झाला. त्यांनी मॉडेलिंगमध्ये सुरुवात करत 1993 मध्ये मिस इंडिया-कॅनडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.

2003 मध्ये त्या ‘क्यों किस लिए’ या बॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकल्या होत्या. त्यानंतर 2004 मध्ये त्या राजकारणात सक्रिय झाल्या. 2009 मध्ये टोरंटो सनने दावा केला होता की, रुबी ढल्ला यांनी त्यांच्या स्वतःच्या चित्रपटाच्या डीव्हीडी विक्रीवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला होता.

 


सम्बन्धित सामग्री